चेन्नई :भारतीय रॉकेट जीएसएलव्ही मार्क 3 ( GSLV Mark 3 ) च्या ऐतिहासिक प्रक्षेपणाचे काऊंडाऊन शनिवारी दुपारी 12.07 वाजता सुरू होईल. 23 ऑक्टोबर रोजी हे रॉकेट नेटवर्क ऍक्सेस असोसिएटेड लिमिटेड वनवेबचे 36 छोटे उपग्रह घेऊन जाणार आहे. वनवेब हा भारत आणि यूके सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. कम्युनिकेशन सेवा देण्यासाठी लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये 650 उपग्रहांचा समूह ठेवण्याची योजना आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( ISRO ) ने यापूर्वी सांगितले होते. की 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 12.07 वाजता रॉकेट 36 उपग्रहांसह झेपावणार आहे.
जीएसएलव्ही मार्क 3 : पहिल्या टप्प्यात घन इंधनाने उडणारे रॉकेट आहे. दुसऱ्या द्रव इंधनाद्वारे आणि तिसरा क्रायोजेनिक इंजिन आहे. वनवेब उपग्रहांचे एकूण प्रक्षेपण वस्तूमान सहा टन असेल. भारतीय रॉकेटमध्ये त्यांचे डिस्पेंसर बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1999 पासून, इस्रोने आजपर्यंत 345 परदेशी उपग्रह कक्षेत ठेवले आहेत. 36 वनवेब उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण 381 पर्यंत पोहोचेल. वनवेबकडून आणखी 36 उपग्रहांचा संच जानेवारी 2023 मध्ये कक्षेत ठेवण्याची योजना आहे. रॉकेटच्या लिफ्टऑफची उलटी गिनती त्याच्या उड्डाणाच्या २४ तास आधी सुरू होईल. काउंटडाऊन दरम्यान, रॉकेट आणि सॅटेलाइट यंत्रणा तपासली जाईल. रॉकेटमध्ये इंधनही भरले जाईल. इस्रोसाठी, हे मिशन ऐतिहासिक आहे कारण इतिहासात प्रथमच, व्यावसायिक प्रक्षेपणासाठी जीएसएलव्ही रॉकेटचा वापर केला जाईल.