महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण कोरोनाबाधित, 190 मृत्यू - 12,666 new corona case

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.

corona-virus-cases-in-chhattisgarh-on-25-april
छत्तीसगडमध्ये रविवारी 12 हजार रुग्ण कोरोनाबाधित, 190 मृत्यू

By

Published : Apr 26, 2021, 8:25 AM IST

Updated : Apr 26, 2021, 9:06 AM IST

रायपूर- छत्तीसगड मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रविवारी राज्यात 12,666 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात तब्बल 190 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11,223 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले. छत्तीसगड राज्यात सध्या एकूण 1,23,835 रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

राजधानी रायपूरमध्ये कोरोना अनियंत्रित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही कोरोना वाढीचा आणि मृतांचा आकडा नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. रविवारी राजधानी रायपूरमध्येर 1,639 नवीन रुग्ण आढळून आले. तर 44 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला.

मृत्यू संख्या

तारीख मृत्यू
16 एप्रिल 138
17 एप्रिल 138
18 एप्रिल 170
19 एप्रिल 165
20 एप्रिल 181
21 एप्रिल 183
22 एप्रिल 197
23 एप्रिल 219
24 एप्रिल 203
25 एप्रिल 190

कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी

तारीख नवे रुग्ण
7 एप्रिल 10310
8 एप्रिल 10652
9 एप्रिल 11447
10 एप्रिल 14098
11 एप्रिल 10,521
12 एप्रिल 13,576
13 एप्रिल 15,121
14 एप्रिल 14,250
15 एप्रिल 15,256
16 एप्रिल 14,912
17 एप्रिल 16,083
18 एप्रिल 12,345
19 एप्रिल 13,834
20 एप्रिल 15,625
21 एप्रिल 14,519
22 एप्रिल 16,750
23 एप्रिल 17,397
24 एप्रिल 16,731
25 एप्रिल 12,666

राज्यातील तीन महत्वाच्या जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या

रायपूर 1,639
दुर्ग 1,355
बिलासपूर 988

दुर्ग जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

दुर्गमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. रविवारी जिल्ह्यात एकूण 1,355 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तर 21 जणांचा मृत्यू झाला. बिलासपूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या ठिकाणी रविवारी 988 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता

राज्यात कोरोना मुळे होणाऱ्या मृतांचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सातत्याने यामध्ये भर पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून 200 पेक्षा जास्त मृत्यूचे आकडे समोर येत आहेत. रविवारी मृतांची आकडेवारी कमी होती.मात्र गेल्या 24 तासात राज्यात 190 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

57,225 जणांची कोरोना चाचणी

राज्यात ज्याप्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे, त्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शनिवारी राज्यात 41,150 नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12,666 जण कोरोनाबाधित आढळून आले.

Last Updated : Apr 26, 2021, 9:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details