महाराष्ट्र

maharashtra

कोरोना लसीकरणाचा पहिला दिवस यशस्वी; कोणताही त्रास झाल्याची नोंद नाही

By

Published : Jan 16, 2021, 8:49 PM IST

संपूर्ण भारतभर लसीकरण करण्यासाठी 16,755 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून एकूण 1,65,714 आरोग्य कर्मचारी व इतर संबंधितांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाची लसीकरण मोहीम यशस्वी झाली. लसीकरणानंतर कोणालाही त्रास झाला नाही, कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अद्याप नोंद नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कोरोना
कोरोना

नवी दिल्ली - कोरोना लसीकरणाचा आज पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला आहे. संपूर्ण भारतभर लसीकरण करण्यासाठी 16,755 कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून एकूण 1,65,714 आरोग्य कर्मचारी व इतर संबंधितांना लस देण्यात आली आहे. पहिल्या दिवसाची लसीकरण मोहीम यशस्वी झाली. लसीकरणानंतर कोणालाही त्रास झाला नाही, कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अद्याप नोंद नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

लसीकरणाचा पहिला दिवस असल्याने काही ठिकाणी लाभार्थ्यांची यादी अपलोड करण्यास उशीर झाला. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड लस सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांना पुरविली गेली. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा पुरवठा 12 राज्यांमध्ये करण्यात आला. दोन्ही लसींची देशभरात एकूण 3351 सत्रे घेण्यात आली, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोविड विरूद्ध विजयाच्या दिशेने

आम्हाला एका वर्षामध्ये कोरोना विरुद्धच्या लढ्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश मिळाले. मागील महिन्यांमधील माहिती आणि मृत्यूचे प्रमाण यातून हेच सूचित होत आहे की, आम्ही हळूहळू कोविड विरूद्ध विजयाच्या दिशेने जात आहोत. यापुढे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियोजन सुरू आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या व्हिडिओ चर्चेवेळी सांगितले.

मला विचारले गेले की मी लस का घेत नाही?

मागील एक वर्षात कदाचित आपल्या सर्वांसाठी आज मोठा आराम घेण्याचा दिवस आहे. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी या दोन लसी 'संजीवनी'सारख्या देशासमोर आल्या. काहीजण समाजातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी लस, त्यांची उपयोगिता, त्यांची सुरक्षा याबद्दल अफवा पसरवित आहेत. आरोग्यमंत्री किंवा लोकप्रतिनिधी लस का घेत नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे. मला विचारले गेले की मी लस का घेत नाही? मी त्यांना सांगितले की, लस घेण्याची माझी अजून वेळ आलेली नाही. मी वाट पाहतोय जेव्हा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जाईल, तेव्हा मला ती घेता येईल, असे हर्षवर्धन म्हणाले.

कोरोना

लष्कराच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस

भारतीय लष्करासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्या ३१२९ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आज कोरोनाचा पहिला डोस घेतला. लष्कराकडून ही अधिकृत माहिती देण्यात आली. लस घेतल्यानंतर मला बरे वाटत असून काहीही तक्रार वाटत नाही. 28 दिवसानंतर आणखी एक डोस घेईन. मी लोकांनी लस घ्यावी असे आवाहन करू इच्छिते, असे कोलकाताच्या वैद्यकीय महाविद्यालयात लस घेणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर प्रियांका मैत्र करक यांनी सांगितले.

हरियाणात १८ कोरोना योद्ध्यांचा लस घेण्यास नकार

देशभरात पहिल्या दिवसाचे लसीकरण सुरळीत पार पडले. मात्र, हरियाणातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. रेवारी येथील पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लस टोचण्यास नकार दिला. आम्हाला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न आरोग्य अधिकाऱ्यांनी केला. पहिल्या दिवशी १०० पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार होती. मात्र, फक्त ४७ कर्मचारी लस घेण्यास पोहचले. १८ कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार दिला.

जोखमीचे काम करणाऱ्यांना प्राधान्य क्रमाने लस मिळणार - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

३ कोटी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. सुरुवातील आरोग्य कर्मचारी आणि प्राध्यान्यक्रमानुसार लस मिळणार आहे. कोविन अ‌ॅपमध्ये सर्व माहिती जमा असेल. त्याद्वारे दुसरा लसीचा डोस कधी घ्यायचा याची माहिती मोबाईलवर मिळणार. लसीचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. एक डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास विसरू नका. दोन्ही डोस दरम्यान सुमारे महिन्याचा काळ लागेल. त्यानंतर दोन आठवड्यांनी शरिरात प्रतिकारक्षमता तयार होईल. मात्र, लस घेतल्यानंतर निष्काळजीपणा करू नका. मास्क आणि कोरोना नियमावलीचे पालन करा, असे पंतप्रधान म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details