हैदराबाद :कोरोनाची दुसरी लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. आज भारतात कोरोनाच्या 2,57,299 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,62,89,290 एवढी आहे. देशात गेल्या २४ तासांत 4,194 नवीन मृत्यू झाले असून, आतापर्यंत मृतांची संख्या 2,95,525 वर गेली आहे. 3,57,630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 2,30,70,365 नागरिकांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 29,23,400 आहे.
देशात आज कोरोनाचे 2.57 लाख नवे रुग्ण, 4194 मृत्यू - कोरोना की दूसरी लहर
भारतातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाउन / कर्फ्यूमुळे कोरोनाचे प्रमाण घटल्याचे तज्ज्ञांने म्हणणे आहे. एकीकडे, जेथे नवीन प्रकरणे कमी होत आहेत. मात्र, संसर्गामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढत आहेत ही चिंतेती बाब आहे.
गेल्या २ तासांत देशात 14,58,895 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आातापर्यंत 19,33,72,819 नागरिकांचे लसीकरण केले आहे. काल भारतात कोरोना विषाणूची 20,66,285 नमुने चाचण्या घेण्यात आली होती. कालपर्यंत एकूण 32,64,84,155 नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
गुजरातच्या चार शहरांमध्ये 1100 हून अधिक काळ्या बुरशीचे प्रकरणे आढळून आले आहेत. गुजरातच्या चार मोठ्या शहरांतील सरकारी रुग्णालयात कोविड -१ मधून बरे झाल्यानंतर काळी बुरशीने संसर्ग झालेल्या 1100 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सरकारच्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने म्यूकोरामायसिस (ब्लॅक फंगस) याला साथीचा रोग जाहीर केला असून या रोगास महामारी रोग अधिनियमांतर्गत अधिसूचित केले आहे. या संसर्गामुळे अहमदाबाद, राजकोट, सूरत आणि वडोदरा शहरांमधील रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.