सिलीगुडी (पश्चिम बंगाल) -पश्चिम बंगालमध्ये शनिवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. यात कूच बिहारमध्ये झालेल्या गोळीबाराच चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्हिडिओ कॉलवरून गोळीबारात ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी सिलीगुडी येथे पत्रकार परिषद घेतली. तेव्हा व्हिडिओ कॉलिंगद्वारे मृतांच्या कुटुंबीयांशी त्या बोलल्या.
केंद्रीय सैन्यांचा वापर करून लोकांना ठार मारण्यात येत आहे. भाजपा नागरिकांची शुद्ध फसवणूक करत आहे. नरसंहार होत आहे. मी आता त्यांच्या कुटुंबीयांना भेटू शकले नाही. मी त्यांना 14 एप्रिलला भेटले. मला त्यांना भेटण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असे ममता म्हणाल्या. जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीआयएसएफ का तैनात केले गेले होते का, असा सवाल दीदींनी केला. वस्तुस्थिती दडपण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे, असेही ममता म्हणाल्या.
मी निवडणूक आयोगाचा आदर करते. पण ते नियम बदलत आहेत. निवडणूक आयोगाची नाही. तर आता भाजपाची आचारसंहिता आहे. पक्षाच्या हितासाठी व्यवस्था बदलली जाऊ शकत नाही. संस्था आणि यंत्रणा कायम राहतील. निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि माध्यमे, या लोकशाही व्यवस्थेला मदत करणाऱ्या तीन महत्त्वाच्या संस्था आहे. पण या तिन्ही संस्था हळूहळू दुबळ्या होत असल्याचे दिसत आहे. किंबहुना यावर भाजपा नियंत्रण मिळवत आहे, असे दीदी म्हणाल्या.
दीदी काढणार होत्या निषेध मोर्चा -