हैदराबाद: राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सध्या तेलंगणामध्ये आहे. आपल्या प्रवासादरम्यान राहुल विविध समुदाय आणि प्रदेशातील लोकांना भेटत आहेत. शनिवारी एक महिला राहुल गांधींना भेटण्यासाठी आली होती. त्या महिलेसोबत राहुल यांचा एक फोटो क्लिक झाला होता. यामध्ये ते तिचा हात धरलेला दिसत आहेत. यावर भाष्य करताना भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी (PRITI GANDHI) यांनी लिहिले की, राहुल गांधी त्यांचे आजोबा नेहरूंचे अनुसरण करत आहेत. त्या नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचा उल्लेख करत होत्या. त्यांच्या या कमेंट वर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
ही महिला एक अभिनेत्री आहे. ती तेलुगु चित्रपटांमध्ये काम करते. ती राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी आली होती. सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्यांनी राहुल गांधींबद्दल बरेच काही लिहिले आहे. काही लोकांनी नेहरूंचा जुना फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते एडविना माउंटबॅटनसोबत दिसत आहेत.
काय म्हणाले नेते? : काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रीती यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, यातून तुमची वाईट विचारसरणी दिसून येते. तुम्हाला उपचाराची गरज आहे.
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याने देशाची प्रगती होते. आंबेडकर, नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांची ही विचारसरणी होती.