राजस्थान -राजस्थानमध्ये काँग्रसने दणदणीत विजय मिळवला आहे. राजस्थान राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला ( Congress Wins 3 Seats In Rajasthan Rajya Sabha Election ) आहे. तर, भाजपाला एकाच जागेवर आपले समाधान मानावे लागले आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपाचे धनश्याम तिवारी विजयी झाले ( BJP Ghanshyam Tiwari Wins Rajyasabha ) असून, अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला ( Subhash Chandra Loses In Rajyasabha ) आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांची जादू चालली आहे. घोडेबाजार, क्रॉस मतदान, आमदार आणि सहयोगी पक्ष यांची नाराजी असताना देखील अशोक गेहलोत यांनी चारपैकी आपल्या तीन उमेदवारांना निवडुण आणले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात त्यांची ताकद वाढली आहे.