महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सत्य बाहेर आलंच, 'हम दो, हमारे दो'; नरेंद्र मोदी स्टेडीयमवरून राहुल गांधींचा हल्लाबोल - राहुल गांधी लेटेस्ट टि्वट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'हम दो..हमारे दो' हा हॅशटॅग वापरत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Feb 24, 2021, 10:10 PM IST

नवी दिल्ली - गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम असे ठेवले आहे. आजचा भारत इंग्लंड सामना सुरु होण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या स्टेडियमध्ये दोन बॉलिंग एन्ड आहेत. त्यातील एकाचे नाव अदानी एन्ड आणि दुसऱ्याचे नाव रिलायन्स एन्ड असं आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'हम दो..हमारे दो' हा हॅशटॅग वापरत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

काँग्रेसची पत्रकार परिषद

सत्य कसे सुंदरतेने बाहेर येते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अदानी एन्ड आणि रिलायन्स एन्ड आहेत. याचे अध्यक्ष जय शाह आहेत, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच' हम दो हमारे दो' हा हॅशटॅग त्यांनी टि्वट केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर, 'हम दो..हमारे दो' अशी घोषणाबाजी करत हल्लाबोल करत आहेत.

मोदी सरकार हे अदानी आणि अंबानी यांना झुकतं माप देतातं, असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. काँग्रेसने पत्रकार परिषद घेत, मोदींवर टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणल्याबद्दल भाजपाने आता "बदला" घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटलं. तसेच भाजपाने स्वतःचा वारसा निर्माण करावा, असेही काँग्रेसने सुचवले.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम -

सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियम असे नाव आधी या स्टेडियमला देण्यात आले होते. मात्र, आता हे स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाणार आहे. हे स्टेडियम 63 एकर जागेवर पसरले असून त्यास तयार करण्यास 800 कोटी रुपये लागले आहेत. सुमारे 1 लाख 32 हजार प्रेक्षकांना सामावून घेईल, येवढे मोठे स्टेडियम आहे. ऑस्ट्रेलियातील 90 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मेलबर्न स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियमने मागे टाकले आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियमचा मान यास मिळाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details