नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक Congress president election 17 ऑक्टोबरला होणार Congress president election Voting असून, त्याची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार Congress President Election Nomination Date असून, त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असल्याचे सूत्रांनी Congress President Election Vote Counting सांगितले. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली.
गेल्या वर्षी CWC ने मंजूर केलेल्या वेळापत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान पूर्ण करायची होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाती घेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे ही माझी वैयक्तिक इच्छा आहे.