नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अशोक गेहलोत प्रकरणामुळे सर्वोच्च नेतृत्वाला मोठा झटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस कार्यकारी समिती ( CWC ) च्या सदस्यांनी गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या ( congress president election ) शर्यतीतून वगळण्याची मागणी केली आहे. त्यांची हकालपट्टी न केल्यास पक्ष नेतृत्वासमोर शिस्तीचा प्रश्न निर्माण होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राजस्थान युनिटमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे ( Senior Congress leader Mallikarjun Kharge ) आणि अजय माकन ( Senior Congress leader Ajay Maken ) या दोन्ही पक्ष निरीक्षकांनी सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोघे जयपूरहून थेट दिल्लीत पोहोचले आणि त्यानंतर 10 जनपथवर पोहोचून सोनियांची भेट घेतली.
राजस्थानमधील काँग्रेसच्या राजकीय गदारोळातपक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिल्लीतील सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भारत जोडो यात्रेतून त्यांना विशेषत्वाने बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक झाल्याचे मानले जात आहे.