सॅन फ्रान्सिस्को :काँग्रेस नेते राहुल गांधी आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले होते. मंगळवारी राहुल गांधी हे सॅन फ्रान्सिस्को येथे दाखल झाले आहेत. यादरम्यान राहुल गांधी हे भारतीय समुदायातील नागरिकांना आणि अमेरिकन खासदारांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल गांधी यांचे विमानतळावर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आणि संघटनेच्या इतर सदस्यांनी स्वागत केले. इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी राहुल गांधी यांना दोन तास विमानतळावर थांबावे लागले. मात्र त्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
विमानात राहुल गांधीसोबत सेल्फी घेण्यासाठी रांगा :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले असता. फ्लाइटमध्ये राहुल गांधींसोबत प्रवास करणाऱ्या अनेकांनी रांगेत थांबून त्यांच्यासोबत सेल्फी काढले. नागरिकांनी त्यांना रांगेत उभे का आहे, असे विचारले असता 'मी एक सामान्य माणूस आहे, मला हे आवडते. मी आता खासदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्को येथील प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. यानंतर ते वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील. त्यासह खासदार आणि अनेक संस्थांशी संबंधित नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
लोकशाहीच्या दृष्टीला चालना देण्यासाठी अमेरिका दौरा :काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारतीय अमेरिकन नागरिकांना संबोधित करणार आहेत. त्यासह राहुल गांधी वॉल स्ट्रीटचे अधिकारी आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाने त्यांचा दौरा संपणार आहे. न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे उद्दिष्ट सामायिक मूल्ये आणि वास्तविक लोकशाहीच्या दृष्टीला चालना देण्यासाठी असल्याची माहिती सॅम पित्रोदा यांनी गेल्या आठवड्यात दिली होती.
राहुल गांधी यांना नवीन पासपोर्ट :राहुल गांधी यांना रविवारी प्रवासासाठी नवीन पासपोर्ट जारी करण्यात आला. राहुल गांधी यांना काँग्रेसचे खासदार म्हणून दिलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा केल्यानंतर त्यांनी सामान्य पासपोर्टसाठी अर्ज केला होता. राहुल गांधी यांना सूरत येथील न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर खासदार म्हणून अपात्र ठरविले होते. यानंतर राहुल गांधींनी डिप्लोमॅटिक ट्रॅव्हल पासपोर्ट परत केला होता.
हेही वाचा -
- Ashok Gehlot Vs Sachin Pilot : राहुल गांधींचे भावनिक आवाहन; गेहलोत-पायलट एकत्र
- Wrestlers Protest : कुस्तीपटूंवरील कारवाईवर राहुल गांधींचे ट्विट; म्हणाले, 'राज्याभिषेक पूर्ण, आता अहंकारी राजा..'