महाराष्ट्र

maharashtra

पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार कोसळले, मुख्यमंत्री नारायणसामींचा राजीनामा

By

Published : Feb 22, 2021, 12:07 PM IST

नारायणसामी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर तामिलीसाई सौंदराराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. काँग्रेस आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार कोसळले, मुख्यमंत्री नारायणसामींचा राजीनामा
पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार कोसळले, मुख्यमंत्री नारायणसामींचा राजीनामा

पुद्दुचेरी :मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांच्या नेतृत्वातील पुद्दुचेरीतील काँग्रेसप्रणित सरकार कोसळले आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात नारायणसामी सरकारला सोमवारी अपयश आले. यानंतर नारायणसामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

11 विरोधात 14 अशा फरकाने नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरले. यानंतर नारायणसामी यांनी लेफ्टनंट गव्हर्नर तामिलीसाई सौंदराराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. काँग्रेस आमदारांच्या राजीनामा नाट्यानंतर पुद्दुचेरीत काँग्रेस सरकार राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर बहुमत चाचणीत काँग्रेस सरकार अपयशी ठरले आहे.

आमदारांचे राजीनामा नाट्य

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. तर एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले होते. तर काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या डीएमके पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतर 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत काँग्रेस सरकारकडे केवळ 12 आमदार राहिले होते.

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.

काँग्रेसकडे 12 आमदारांचे संख्याबळ ( विधानसभा सदस्य संख्या 33)

काँग्रेस - 9 ( काँग्रेसकडे 15 आमदार होते, पाच आमदारांनी राजीनामा दिलाय. तर एक आमदार आयोग्य घोषित)

डीमके - 2 (3 पैकी एकाचा राजीनामा)

अपक्ष आमदार - 1

विरोधकांकडे - 14 संख्याबळ

एआयएनआर - 7

एआयएडीएमके - 4

भाजपा - 3

ABOUT THE AUTHOR

...view details