श्रीनगर - गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिलेले 23 नेते पुन्हा एकदा जम्मूत एकत्र जमले आहेत. जम्मूत शांती संमेलन आयोजीत करण्यात आले आहेत. यावेळी राज बब्बर यांनी संबोधित केले. आम्हाला जी -23 म्हटलं जात आहे. मात्र, आम्ही गांधी-23 आहोत. देशाचा कायदा आणि राज्यघटना महात्मा गांधींच्या विश्वासाने, दृढनिश्चयाने आणि विचारांनी बनविल्या गेल्या. त्यांना पुढे नेण्यासाठी काँग्रेस ठामपणे उभी आहे. आमचा उद्देश काँग्रेसला बळकट करण्याचा आहे. त्यावर आम्ही काम करणार आहोत, असे बब्बर म्हणाले.
राज बब्बर यांच्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची प्रशंसा केली. गुलाम नबी आझाद हे एक अनुभवी नेता आहेत. मात्र, आजपर्यंत काँग्रेसने त्याचा फायदा करून घेतला नाही. हे मला अद्याप समजले नाही, असे सिब्बल म्हणाले.