नवी दिल्ली - आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची निवड झाली आहे. तर कमलेश्वर पटेल आणि दीपिका पांडेय सिंह यांची छाननी समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
काँग्रेसच्या छाननी समितीमध्ये एक्स ऑफिस सदस्य म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी महासचिव जितेंद्र सिंह यांची निवड झाली आहे. याचबरोबर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रिपून बोला, देवव्रत सैकिया आणि पृथ्वीराज साठे यांचीही एक्स ऑफिस सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.
हेही वाचा-आसामचा आखाडा! तीन टप्प्यात पार पडणार मतदान, काय आहेत राजकीय समीकरणे
आसाममध्ये १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिलला होणार आहे. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे.
हेही वाचा-विधानसभेची रणधुमाळी सुरू, प्रियंका गांधी आसाम दौऱ्यावर
भाजपासमोर सत्ता राखण्याचे आव्हान -
काँग्रेस आसाम राज्यात कमी पडली असली तरी भाजपाला यावेळी सत्ता मिळवणे कठिण असल्याच चित्र आहे. आसाममध्ये धार्मिक बहुलता आहे. एनआरसी आणि सीएए कायद्यांमुळे भाजपाच्या पुढे एक आव्हान निर्माण झाले आहे. या कायद्यांविरोधात आसाममध्ये मोठे आंदोलन झाले होते. मात्र, सत्ता कायम राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न, प्रचारही जोरात सुरू आहे. येत्या निवडणूकामध्ये भाजपकडून माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नावावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.