महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Assembly election 2023 : कर्नाटकमधील निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचे राज्यसभा निवडणुकीतही होणार पारडे जड - कर्नाटक विधानसभा काँग्रेस राज्यसभा फायदा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे पुढील वर्षी कर्नाटकात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत होणार आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे आगामी काळात काँग्रेस पक्षाला अनेक फायदे होणार आहेत. काँग्रेसला पुढील वर्षी राज्यसभेच्या चार जागा जिंकण्यास मदत होणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल
Karnataka Assembly election 2023

By

Published : May 14, 2023, 11:10 AM IST

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामुळे काँग्रेसला चांगलेच बळ मिळाले आहे. पुढील वर्षी राज्यात रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या चार जागांपैकी तीन जागांवर पक्षाला विजय मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील चार राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन, जीसी चंद्रशेखर आणि कॉंग्रेसचे एल हनुमंथैया आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा कार्यकाळ 2024 मध्ये संपत आहे. शनिवारी, राज्यातील 224 पैकी 65 विधानसभेच्या जागा जिंकणारा भाजप पुढील वर्षी राज्यसभेवर आपला एक उमेदवार पाठवू शकेल. राज्यातील 12 राज्यसभेच्या जागांपैकी काँग्रेसकडे पाच आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) एक सदस्य आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राज्यसभेतील एकमेव सदस्य आहेत. भाजपकडे सध्या कर्नाटकमधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह सहा राज्यसभा सदस्य आहेत.

काँग्रेसला राज्यसभेत मिळणार फायदा-एच. डी. देवेगौडा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ 2026 मध्ये भाजपच्या इराणा कडाली आणि नारायण कोरगप्पा यांच्यासोबत संपणार आहे. सीतारामन यांच्यासह अन्य चार सदस्यांचा कार्यकाळ 2028 मध्ये संपणार आहे. 224 सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत शनिवारी काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी आवश्यक 113 जागांचा जादुई आकडा पार केला. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा परिणाम इतर राज्यांतील निवडणुकांवरही होणार असल्याचे राजकीय नेत्यांनी सांगितले. याचा फायदा काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीतही होणार आहे.

काँग्रेसला मिळाले स्पष्ट बहुमत-कर्नाटकमधील जनतेप्रमाणे दरवेळेप्रमाणे सत्तेची भाकरी फिरवित विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत दिले आहे. काँग्रेसने 135 जागा तर भाजपने 65 जागांवर विजय मिळवला आहे. जेडीएसने केवळ 19 जागावर विजय मिळवून किंगमेकरची भूमिका मिळविण्याची संधी सोडली आहे. तर अन्य उमेदवारांनी 4 जागांवर विजय मिळविला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमत्रीपदाची माळ पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कर्नाटकात मुख्यमंत्रीपदावरून वाद टाळण्यासाठी काँग्रेसने नवीन फॉर्म्यूला तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये पहिले अडीच वर्षे सिद्धरामय्या आणि पुढची अडीच वर्षे डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी देण्यात येतील, अशी चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details