बर्मिंगहॅम: बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनने मलेशियाच्या आंग जे योंगचा 19-21, 21-9, 21-16 असा पराभव केला. यासह त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. राष्ट्रकुल 2022 ( Commonwealth Games 2022 ) मधील भारताचे हे 20 वे सुवर्णपदक ( Lakshya Sen won gold medal in badminton ) आहे. त्याचबरोबर आज भारताने बॅडमिंटनमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे.
भारताचे पदक विजेते -
20 सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टीटी पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश, नवीन, भाविना, नीतू, अमित पंघल, नीतू पंघल, अल्धौस जरीन, शरथ-श्रीजा, पी.व्ही.सिंधू, लक्ष्य सेन.
15 रौप्य: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साठियान, महिला क्रिकेट संघ, सागर.
22 कांस्य: गुरुराजा, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोक्स, महिला संघ, संदीप कुमार,अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदाम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.
हेही वाचा -Commonwealth Games 2022 : पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये पटकावले सुवर्णपदक; कॅनडाच्या मिशेल ली'ला चारली धूळ