महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Comet Near Earth 2023 : 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान घडणार हिरव्या रंगाच्या धूमकेतूचे दर्शन, जाणून घ्या सविस्तर

पाषाण काळातील धूमकेतू 50 हजार वर्षांनंतर पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या धूमकेतूला 'हिरवा धूमकेतू' म्हटले जाते. अथांग अंतराळात प्रवास केल्यानंतर हा धूमकेतू परतत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तो पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचेल. धूमकेतू कधी आणि कसा दिसेल, त्याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Comet Near Earth 2023
हिरवा धूमकेतू

By

Published : Jan 31, 2023, 4:15 PM IST

विजयवाडा :दोन दिवसांनंतर आकाशात चमत्कार घडणार आहे. हजारो वर्षांपूर्वी दिसणारा धूमकेतू पुन्हा आकाशात दिसणार आहे. हिरवा धूमकेतू म्हणून ओळखला जाणारा धूमकेतू विजयवाड्यातील रहिवाशांना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान पाहता येईल. शहराच्या उत्तरेला ध्रुव तारा आहे, जो सप्तर्षी मंडळाच्या मध्यभागी दिसतो. 50 हजार वर्षांपूर्वी हिमयुगात दिसणारा धूमकेतू आता दिसणार असल्याचे अवकाश संशोधकांचे म्हणणे आहे.

धूमकेतू म्हणजे काय : धूमकेतूच्या शरीराचा गाभा (nucleus) वायू आणि धूळ (silica dust) यांनी बनलेला असतो. प्रदक्षिणा मार्गावरून प्रवास करीत असताना सूर्याच्या दिशेने धूमकेतू जसजसा जवळ येऊ लागतो, तसतसे सूर्याचे किरण त्यावर पडून वायू आणि धुलिकण तप्त होतात व जोमाने प्रसारानं पावतात. अशा तऱ्हेने एक प्रकारचा वायू आणि धुलिकणांचा ढग तयार होतो, यालाच धूमकेतूचा कोमा म्हणतात. गाभा व गाभ्याभोवती तयार झालेला हा कोमा (coma) मिळून धूमकेतूचे शीर तयार होते.

सूर्यमालेत धूमकेतूंना खूप महत्त्व आहे : धूमकेतू हे वायूंनी भरलेले अवकाशातील बर्फाचे गोळे आहेत. जेव्हा ते सूर्याजवळ येतात तेव्हा ते तापतात आणि तीव्र उष्णतेमुळे धूळ आणि वायू बाहेर टाकतात. म्हणूनच ते शेपटीसह दिसतात. सूर्यमालेत धूमकेतूंना खूप महत्त्व आहे. धूमकेतू मुळे पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती कशी झाली, हे देखील सांगितले जाऊ शकते. तसेच सौर मंडळाच्या निर्मितीची परिस्थिती समजू शकते. एक प्रकारे ज्या धूमकेतूच्या थेंबांनी पृथ्वीवर जीवन आणले. हजारो वर्षांनंतर शहरातील रहिवाशांना इतका महत्त्वाचा धूमकेतू पाहण्याची संधी मिळाली आहे, अशी माहिती मुंबई येथील अक्षय गंगा सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमीचे अमृतांशू वाजपेयी आणि हौशी खगोलशास्त्रज्ञ मेदुरु सुरेश यांनी दिली.

हिरवा धूमकेतू :2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान दिसणाऱ्या या धूमकेतूला हिरवा धूमकेतू म्हटले जात आहे. परंतु त्याचे अधिकृत नाव C/2022 E3 आहे. हा धूमकेतू सूर्याभोवती एक प्रकारे प्रदक्षिणा घालत आहे. तो आपल्या सौरमालेच्या बाहेरील क्विपर बेल्टच्या पलीकडे अंतराळातून परत आला आहे. त्यामुळेच पृथ्वीच्या जवळ यायला इतका वेळ लागला आहे. सूर्याच्या जवळ आल्यानंतर या बर्फाळ खगोलीय पिंडाची चमक सतत वाढत आहे. 1 फेब्रुवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान ते पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल. या दरम्यान पृथ्वी आणि धूमकेतू यांच्यामध्ये 42 दशलक्ष किमीचे अंतर असेल. हा धूमकेतू पोलारिस नावाच्या ताऱ्याजवळच्या आकाशात पहाटे संध्याकाळी दिसु शकतो. मात्र सूर्याजवळ धूमकेतूची चमक किती वाढणार, त्यावर तो पृथ्वीवरुन किती स्पष्ट दिसणार आहे, हे माहिती पडेल.

ABOUT THE AUTHOR

...view details