लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रयागराजमधील बाघम्बरी मठात पोहोचले आहेत. योगींनी महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. योगी यांनी महंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महंत नरेंद्र यांच्या मृत्यून अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, की महंताच्या मृत्यूने सर्वजण व्यथित आहेत. संत समाजाकडून मी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने महंत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कुंभ 2019 यात्रा यशस्वी करण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांना महत्त्वाचे योगदान दिले होते. नरेंद्र गिरी यांनी सर्वप्रकारे मदत केली होती. महंत नरेंद्र गिरी यांच्या जाण्यामुळे अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. कुंभ ही जगातील अद्धभुत घटना मानली जाते. अशावेळी साधुंच्या समस्या, धर्माचार्य यांच्या समस्या, आखाडा परिषदेमधील मंदिराच्या समस्या याबाबतच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्यांचे सहकार्य मिळाले.
संबंधित बातमी वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी शिष्य आनंद गिरीला हरिद्वारमधून अटक
आरोपींना कठोर शिक्षा होणार-
चार अधिकारी प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा मिळेल. उद्या महंत यांचा शवविच्छेदनाचा अहवाल मिळेल. योगी यांनी पोलीस आयुक्त, एडीजी, आयजी, डीआयजी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मठ बाघम्बरी गादीच्या सनातन परंपरेनुसार महंत नरेंद्र गिरी यांना समाधी दिली जाणार आहे.