अयोध्या :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी 11 वाजता अयोध्येच्या शरयू तीरावर नव्याने बांधलेल्या लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन ( Lata Mangeshkar Chowk Inauguration ) केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून या नयनरम्य जागेचे बांधकाम करण्यात आले. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ हा चौक बांधण्यात आला. या चौकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे बसवण्यात आलेली महाकाय वीणा, जिची लांबी 40 फूट आणि वजन 14 टन आहे. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्मारकाचे बांधकाम करणारे राम. व्ही. सुतार यांचीही भेट घेतली.
lata mangeshkar chowk : मुख्यमंत्री योगींच्या हस्ते अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त, मुख्यमंत्री योगी यांनी रामनगरी अयोध्येतील सरयू तीरावर नव्याने बांधलेल्या लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केले. ( Lata Mangeshkar Chowk Inauguration )
कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची ऑनलाईन उपस्थिती : उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम कथा पार्कमध्ये असलेल्या सभेच्या ठिकाणी पोहोचले. जिथे ते अयोध्येतील ज्येष्ठ संतांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी ( व्हर्च्युअल ) उपस्थितीत त्यांचा संदेश ऐकवण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मार्गदर्शन केले. मणिराम दास छावणीचे महंत नृत्य गोपाल दास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याशिवाय राज्य सरकारचे अनेक मंत्री, अयोध्येतील ज्येष्ठ संत, जिल्ह्यातील खासदार आणि सर्व आमदार, मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, योगी समर्थक आणि सर्वसामान्य जनता या कार्यक्रमाला उपस्थित होते.