महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नितीन गडकरी-मुख्यमंत्र्यांसमोरच एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले!

विमानतळावर पोहोचलेल्या नितीन गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव व मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलीस अधीक्षक हे सुरक्षा अधिकाऱ्याला लाथ मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते

मुख्यमंत्र्यांसमोरच एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले
मुख्यमंत्र्यांसमोरच एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले

By

Published : Jun 23, 2021, 7:14 PM IST

Updated : Jun 23, 2021, 8:17 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) - कुल्लू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या सुरक्षा अधिकारी हे आपआपसात भिडल्याचा झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासमोरच घडला आहे.

विमानतळावर पोहोचलेल्या नितीन गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव व मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी पोलीस अधीक्षक हे सुरक्षा अधिकाऱ्याला लाथ मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या ताफ्यामध्ये दोन सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.

एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले!

हेही वाचा-पोलिसांसाठी काम करणाऱ्या तरुणाचा नक्षलवाद्यांकडून खून

लोकांना भेटण्यासाठी गडकरी वाहनातून उतरले!

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे विमानतळावर पोहोचले होते. केंद्रीय मंत्र्यांचा ताफा विमानतळावरून बाहेर येत असताना स्थानिक नागरिक हे केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले. ते पाहून केंद्रीय मंत्री हे वाहनातून उतरून त्यांना भेटण्यासाठी गेले. ते पाहून मुख्यमंत्री जयराम ठाकूर हेदेखील लोकांना भेटण्यासाठी वाहनातून उतरले.

हेही वाचा-रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आठवड्यात दुसऱ्यांदा शरद पवारांची घेतली भेट

केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांसमोरच एसपी व सुरक्षा अधिकारी भिडले-

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरींना भेटण्यासाठी पोहोचलेल्या लोकांनी हिमाचल प्रदेशच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मागणीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. सुरक्षा अधिकारी व एसपी यांच्यातील वादानंतर स्थानिकांनी एसपी यांची बाजू घेत घोषणाबाजी केली.

Last Updated : Jun 23, 2021, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details