महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CJI Visited Columbia University : CJI एनव्ही रमणा अमेरिका दौऱ्यावर; मीट आणि ग्रीट कार्यक्रमात शनिवारी करणार संबोधन - एनव्ही रमणा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा हे अमेरिकेच्या दौऱ्यावर ( CJI NV Ramana is touring America ) आहेत. याच पार्श्वभूमीवर CJI यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाला भेट ( CJI visited the columbia university campus ) दिली. विद्यापीठाच्या ग्रंथालयातील डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी 'स्कॉलर्स लायन'मध्ये काही वेळ घालवला.

CJI Visited Columbia University
CJI एनव्ही रमणा यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली

By

Published : Jun 24, 2022, 10:51 PM IST

Updated : Jun 24, 2022, 10:59 PM IST

कोलंबिया - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा हे अमेरिकेच्या दौऱ्यावर ( CJI NV Ramana is touring America ) आहेत. याच पार्श्वभूमीवर CJI यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाच्या ग्रंथालयातील डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी 'स्कॉलर्स लायन'मध्ये काही वेळ घालवला.

CJI एनव्ही रमणा यांनी शुक्रवारी न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया विद्यापीठाला भेट दिली

विमानतळावर जंगी स्वागत - गुरुवारी न्यूयॉर्क विमानतळावर न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एला, एमडी सुचित्रा एला, भारतीय महावाणिज्य दूतावास रणधीर जैशवाल, TANA माजी अध्यक्ष जय थल्लुरी आणि TANA मान्यवर वालवेती ब्रह्माजी, वासिरेड्डी वामसी आणि अरविंद यांनी एनव्ही रमाना यांचे स्वागत केले.

डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

तेलगू समुदायाला करणार संबोधित - वॉशिंग्टन डीसीच्या तेलगू समुदायाच्या संयुक्त विद्यमाने व्हर्जिनियामध्ये होणाऱ्या मीट आणि ग्रीट कार्यक्रमात न्यायमूर्ती एनव्ही रमणा सहभागी होतील. सीजेआय यांच्या सन्मानार्थ मिलपिटास येथे 1 जुलै रोजी असोसिएशन ऑफ इंडो-अमेरिकन यांनी मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. CJI एनव्ही रमणा हे त्यांना आणि तेथील भारतीयांना संबोधित करतील.

डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

हेही वाचा - Sharad Pawar Meet CM : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार उतरले मैदानात; बंददाराआड मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा

हेही वाचा -Nilam Gorhe On Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राज्यघटनेबाबत अनभिज्ञ - नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंना सुनावले

Last Updated : Jun 24, 2022, 10:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details