नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा ( CJI N V RAMANA ) यांचा 26 ऑगस्टला कार्यकाळ संपत आहे. सरन्यायाधीशएन. व्ही. रमणा यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक न्यायाधिशांची नियुक्ती केली आहे. त्यांनी 100 पेक्षा न्यायाधिशांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पाच न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय आणि अन्य नियुक्त्या उच्च न्यायालयातील आहे. दरम्यान, अद्यापही 380 न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत.
24 एप्रिल 2021 पासून एन. व्ही. रमणा यांनी सरन्यायाधीशपदाची सुत्रे हाती घेतली होती. जस्टीस शरद बोबडे यांच्या जागी एन. व्ही. रमणांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा भारतातील उच्च न्यायालयात 411 न्यायाधिशांची पदे खाली होती. या न्यायाधिशांची नियुक्ती कॉलेजियम समितीच्या माध्यमातून केली जाते. कॉलेजिय समितीमध्ये पाच ज्येष्ठ न्यायाधीश असतात. त्याच माध्यमातून एन. व्ही. रमणांनी या सर्व न्यायाधिशांची नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारनेही त्यांनी केलेल्या नियुक्त्या मान्य केल्या आहेत. दरम्यान, जस्टीस शरद बोबडे यांच्या कार्यकाळात एकाही न्यायाधिशांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. एक वर्षांचा त्यांचा कार्यकाळ होता. मात्र, त्यांच्या कार्यकाळात कोरोनाचे संकटही होते.