नई दिल्ली: चिराग पासवान यांनी वडील दिवंगत रामविलास पासवान यांचा दिल्लीतील बंगला रिकामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील इस्टेट संचालनालयाचे पथक तेथे पोहोचले होते. दिल्लीतील जनपथ येथे हा बंगला आहे.
पासवान यांच्याकडून बंगला खाली - लोक जनशक्ती पक्षाचा अधिकृत पत्ता असलेल्या 12 जनपथ येथील पासवान यांच्या बंगल्यातून सामान हलवण्यात आले आहे. येथे पोलीस पथकही उपस्थित होते. हा बंगला केंद्रीय मंत्र्यांसाठी असल्याचे सदस्याच्या निधनानंतर किंवा कार्यकाल संपल्यानंतर तो खाली कारावा लागतो. त्या नियमानुसार पासवान यांच्याकडून बंगला खाली केला जात आहे.