महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चीनची मुजोरी कायम, शाहिद मेहमूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव पुन्हा रोखला - China blocked Shahid Mehmood proposal

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा (lashkar e taiba) दहशतवादी शाहिद मेहमूदचा (Shahid Mehmood) जागतिक दहशतवादाच्या यादीत (global terrorist) समावेश करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव चीनने रोखला आहे.

China blocked Shahid Mehmood proposal
China blocked Shahid Mehmood proposal

By

Published : Oct 19, 2022, 1:44 PM IST

संयुक्त राष्ट्र: पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा (lashkar e taiba) दहशतवादी शाहिद मेहमूदचा (Shahid Mehmood) जागतिक दहशतवादाच्या यादीत (global terrorist) समावेश करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव चीनने रोखला आहे. चार महिन्यांत चौथ्यांदा चीनने भारताचा हा प्रयत्न रोखला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत चीनने हे पाऊल उचलले आहे.

अलीकडच्या काही महिन्यांत चीनने '1267 अल कायदा प्रतिबंध समिती' अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव रोखण्याची ही चौथी वेळ आहे. डिसेंबर 2016 मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने मेहमूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

मसूद अजहरच्या बाबतीतही केला होता नकाराधिकाराचा वापर: तीन वर्षांपूर्वी मसूद अजहरला देखील जागतिक दहशतवादी घोषित करण्यास चीनने खोडा घातला होता. या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकाराचा वापर केला होता. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने स्वीकारली होती. मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेच्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटन या दोन्ही देशांनीही पाठिंबा दिला होता. या यादीमध्ये अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयसिस) सारख्या संघटनांचा समावेश आहे.

नौदल प्रमुखांनी देखील व्यक्त केली होती चिंता:चीनच्या बाबतीत नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी देखील चिंता व्यक्त केली होती.नौदल प्रमुख म्हणाले होते की, चीन हे भारतापुढील एक प्रबळ आव्हान बनले आहे. चीनने हिंदी महासागर क्षेत्रात नौदल उपस्थिती सामान्य करण्यासाठी ऑपरेशनद्वारे केवळ आपल्या जमिनीच्या सीमेवरच नव्हे, तर सागरी क्षेत्रातही आपली उपस्थिती वाढवली आहे. चीन 2008 पासून हिंदी महासागरात आहे. त्याने जिबूतीमध्ये लष्करी तळही बांधला आहे. तसेच, ते श्रीलंका, म्यानमार आणि पाकिस्तान आणि इतर देशांच्या किनारपट्टीवरील प्रदेशात विविध बंदरे विकसित करत आहे. नौदल प्रमुख म्हणाले, आम्ही हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. दोन्ही राष्ट्रांमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याने संभाव्य युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details