नवी दिल्ली : भाजपाने गुरुवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी अनुक्रमे 39 आणि 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रत्येकी पाच महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात भाजपाने खासदार विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या वर्षी निवडणुका -मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपाने जबलपूर पूर्वमधून आंचल सोनकर, झाबुआमधून भानू भुरिया, छतरपूरमधून ललिता यादव यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपाने छत्तीसगडमधील कोरबा विधानसभा मतदारसंघातून लखनलाल दिवांगन आणि पाटणचे खासदार विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पाटण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे बघेल विरुद्ध बघेल असा सामना येणाऱया निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
मध्य प्रदेशासाठी भाजपाची पहिली यादी - भाजपाने मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांची निवड करण्यात आली आहे. ही पहिली यादी पक्षासाठी खूप महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह हे 20 ऑगस्टला भोपाळ दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशातील भाजपा प्रचाराच्या कामासाठी तयारीला लागली आहे.
छत्तीसगडमध्ये बघेल विरुद्ध बघेल - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 10 अनुसूचित जमाती, 1 अनुसूचित जाती आणि 10 सर्वसाधारण जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पाटण या हायप्रोफाईल जागेसाठी भाजपाने विजय बघेल यांना उमेदवारी दिली आहे. सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामुळे पाटण मतदारसंघात बघेल विरुद्ध बघेल असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. पाटण हा मुख्यमंत्री बघेल यांचा विधानसभा मतदारसंघ असून, विजय बघेल हे त्यांचे पुतणे आहेत. यावेळीही सीएम बघेल येथून निवडणूक लढवणार असल्याने काका-पुतण्यांमध्ये रंजक लढत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis Loksabha : फडणवीस नागपुरातून लोकसभा लढवणार? बावनकुळे म्हणाले...