महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकशाहीचा विजय असो! सामान्य कामगारानं केला विद्यमान मंत्री अन् ७ वेळच्या आमदाराचा पराभव

Chhattisgarh Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले आहेत. चारही राज्यांमध्ये काही निकाल अगदी अपेक्षित होते. तर काही जागांवरचे निकाल आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावणारे लागले. छत्तीसगडमधल्या साजा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्याविरुद्ध एक सामान्य कामगार उभा राहिला होता. ३ डिसेंबरला जेव्हा निकाल आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

Chhattisgarh assembly election 2023
Chhattisgarh assembly election 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 3:42 PM IST

ईश्वर साहू

बेमेतरा (छत्तीसगड) Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकांसाठी अनपेक्षित होते. येथे भारतीय जनता पार्टीनं विद्यमान काँग्रेस सरकारचा पराभव केला. असाच एक धक्कादायक निकाल राज्यातील साजा विधानसभा मतदारसंघात लागला. येथे एका ५ वी उत्तीर्ण कामगारानं चक्क राज्याचे मंत्री आणि ७ वेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचा पराभव केला!

विद्यमान मंत्र्यांचा पराभव केला : साजा विधानसभा जागेवर १७ नोव्हेंबर रोजी मतदान झालं. या जागेवर ईश्वर साहू यांनी राज्याचे मंत्री रवींद्र चौबे यांचा ५००० हून अधिक मतांनी पराभव केला. "हा आपला विजय नसून साजाच्या जनतेचा विजय आहे", अशी ईश्वर साहू यांची प्रतिक्रिया आहे. निवडणुकीपूर्वी ईश्वर साहू यांनी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान ते म्हणाले होते की, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चौबे यांच्याविरोधात साजा येथील जनता निवडणूक लढवत आहे. ईश्वर साहू यांचं हे विधान खरं ठरलं आणि साजा येथील जनतेनं मंत्र्याला घरी बसवलं. ते ईश्वर साहू यांच्याकडून ५१९६ मतांनी पराभूत झाले.

"हा साजाच्या जनतेचा विजय आहे. अन्यायावर न्यायाचा विजय झाला.'' - ईश्वर साहू, विजयी भाजपा उमेदवार, साजा विधानसभा जागा

निवडणुकीपूर्वी काय झालं होतं : ८ एप्रिल रोजी बेमेतराच्याबिरनपूरमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक हाणामारी झाली होती. यामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. भुनेश्वर साहू असं या तरुणाचं नाव. तो ईश्वर साहू यांचा मुलगा होता. या हिंसक संघर्षाला राजकीय रंग देत विश्व हिंदू परिषदेनंही यात उडी घेतली. विहिंपनं १० एप्रिल रोजी छत्तीसगड बंद पुकारला होता. या काळात गोंधळ आणखी वाढला. जाळपोळीच्या घटनाही घडल्या. ११ एप्रिलला बिरनपूरमध्ये आणखी दोन मृतदेह सापडले. यानंतर भाजपानं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

अशी मिळाली उमेदवारी : या प्रकरणी कारवाई करत राज्य सरकारनं आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. तसेच नुकसान भरपाई म्हणून पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. छत्तीसगड विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं भाजपानं ईश्वर साहू यांना साजामधून उमेदवारी देण्याची घोषणा केली. ईश्वर साहू यांना तेथील जनतेची साथ मिळाली आणि आता एक सामान्य कामगार आमदार बनला आहे!

हेही वाचा :

  1. राजस्थानात कमळ फुललं! काँग्रेसचा दारुण पराभव; अनेक दिग्गजही पराभूत
  2. भाजपाचा असा नेता ज्यानं एकाच वेळी दिला विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्याला धोबीपछाड!

ABOUT THE AUTHOR

...view details