महाराष्ट्र

maharashtra

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सने चेन्नईविरुद्ध 32 धावांनी विजय मिळवत पटकावले गुणतालिकेत अव्वल स्थान

By

Published : Apr 27, 2023, 7:51 PM IST

Updated : Apr 28, 2023, 7:54 AM IST

आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 37 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. ज्यात राज्यस्थान संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 202 धावा केल्या आणि चेन्नईलाविजयासाठी 203 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 170 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईचा 32 धावांनी पराभव झाला.

CSK vs RR IPL 2023 LIVE
CSK vs RR IPL 2023 LIVE

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 37 वा सामना जयपूरच्या स्वामी मानसिंग स्टेडियमवर चेन्नई आणि राज्यस्थान यांच्यात खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यात त्याने चांगली सुरुवात केली आणि 20 षटकात 5 गडी गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून एकूण 170 धावा केल्या. आणि चेन्नईचा पराभव झाला.

राज्यस्थान रॉयल्सची बॅटिंग : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने सीएसकेला विजयासाठी 203 धावांचे लक्ष्य दिले होते. ज्यामध्ये यशस्वी जैस्वालने 77, जोस बटलरने 27, संजू सॅमसनने 17, शिमरन हेटमायरने 8, ध्रुव जुरेलने 34, देवदत्त पडिकल्लाने 27 धावा (नाबाद) आणि अश्विनने 1 धाव (नाबाद) केली.

चेेन्नईची गोलंदाजी: चेन्नई सुपर किंग्जने प्रथम गोलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स घेतल्या. ज्यात आकाश सिंगने 2 षटकांत 0 बळी, तुषार देशपांडेने 4 षटकांत 2 धावा देत 2 बळी, मनीषने 4 षटकांत 1 विकेट, जडेजाने 4 षटकांत 1 विकेट, मोईन अलीने 2 षटकांत 0 धावा देत 0 आणि मथिशाने 0 बळी घेतले.

सातपैकी पाच विजय: चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात सातपैकी पाच सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. आधिच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मोसमातील सर्वोच्च धावसंख्येनंतर ते या सामन्यात आले. डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 235 धावा केल्या. या बदल्यात केकेआरने 20 षटकांत आठ विकेट गमावून केवळ 186 धावा केल्या होत्या. त्यामुळे सीएसकेने हा सामना 49 धावांनी जिंकला होता.

अजिंक्य रहाणेला झेलबाद : राजस्थान रॉयल्सचा अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनने 11व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 15 धावसंख्येवर अजिंक्य रहाणेला झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या अंबाती रायडूला जेसन होल्डरने शून्य धावांवर झेलबाद करून अश्विनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चेन्नई सुपर किंग्जची 11 षटकांनंतर धावसंख्या 73/4 अशी होती.

सर्वात मोठी धावसंख्या :जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने मोठी धावसंख्या केली. आजपर्यंत या मैदानावर आयपीएलमध्ये कधीही २०० च्यावर धावसंख्या झालेली नाही. राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ७७ धावा केल्या आहेत. अखेरच्या षटकात ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 34 धावा केल्या तर, देवदत्त पडिक्कलने 13 चेंडूत नाबाद 27 धावा के्ल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमावून 202 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सीएसकेकडून तुषार देशपांडेने 2, रवींद्र जडेजा आणि महेश थेक्षानाने 1-1 बळी घेतले.

2 सामन्यात पराभवाचा सामना :चेन्नईने त्यांच्या शेवटच्या 3 सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक केली आहे, तर राजस्थान रॉयल्सला त्यांच्या शेवटच्या 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तथापि, आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दोन्ही संघ आयपीएल चॅम्पियन्सच्या दावेदारांपैकी एक आहेत. कारण दोन्ही संघांमध्ये अनेक सामने जिंकणारे खेळाडू आहेत.

राजस्थान रॉयल्सचे खेळाडू :यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (wk/c), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल बदली खेळाडू: डोनोव्हन फरेरा, एम अश्विन, रियान पराग, केएम आसिफ, कुलदीप सेन.

चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू :रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (wk/c), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश ठेक्शाना, आकाश सिंग बदली खेळाडू:अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, राजवर्धन हंगेरगेकर.

हेही वाचा - Sai Temple CISF Security : शिर्डीतील साई मंदिरासाठी लवकरच केंद्राची सुरक्षा राहणार; 'हे' आहे कारण

Last Updated : Apr 28, 2023, 7:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details