बेंगळुरू :चंद्रयान-3 प्रकल्पाच्या ताज्या अपडेटमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी सांगितलं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक लँडिंग झाल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी चंद्रावर भूकंपीय उपकरणानं म्हणजेच (ILSA) पेलोड, तीन दिवसांनी, एक 'घटना' नोंदवली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये, इस्रोनं सांगितलं की 'घटना' नैसर्गिक असल्याचं दिसतंय. याबाबत त्याची चौकशी केली जात आहे. स्पेस एजन्सीनं सांगितलं की ILSA पेलोडनं रोव्हर, इतर पेलोडच्या हालचाली देखील रेकॉर्ड केल्या आहेत.
पेलोडच्या हालचाली रेकॉर्ड :इस्रोनं आपल्या ताज्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'चंद्रयान-3 लँडरवरील लूनर सिस्मिक ॲक्टिव्हिटी (ILSA) पेलोडच्या मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम (MEMS) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणानं रोव्हरसह इतर पेलोडच्या हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. याव्यतिरिक्त, 26 ऑगस्ट 2023 रोजी एक घटना देखील रेकॉर्ड केलीयं. जी नैसर्गिक असल्याचं दिसतं. या घटनेच्या स्रोताचा शोध घेण्यात येत आहे.
प्लाझ्मा वातावरणाचं मोजमाप : दुसर्या पोस्टमध्ये, स्पेस एजन्सीनं सांगितलं की चंद्राच्या रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर आणि ॲटमॉस्फियर - लॅंगमुइर प्रोब (रंभा-एलपी) पेलोड चंद्रयान-3 लँडरनं दक्षिण ध्रुवावर जवळच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा वातावरणाचं पहिलं मोजमाप केलंय. 'प्रारंभिक मूल्यांकनावरून असं दिसून आलं, की चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्मा तुलनेनं विरळ आहे. याव्यतिरिक्त, आगामी चंद्रावर लँडिंगसाठी प्रगत डिझाइनमध्ये याचा वापर करता येऊ शकतो.