बंगळुरू :चंद्रयान 3 चंद्रावरील दक्षिण ध्रूवावर उतरण्यास सज्ज झालं आहे. उद्या सायंकाळी चंद्रयान 3 दक्षिण ध्रूवावर उतरण्याची शेवटची कसोटी पार करणं बाकी आहे. दक्षिण ध्रूवावर या अगोदर रशियाच्या 'लुना' हे यान क्रॅश झालं होतं. त्यामुळे दक्षिण ध्रूवावर 'विक्रम लँडर' उतरवणं खडतर असल्याचं स्पष्ट झालं. दक्षिण ध्रूवावर लँडर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्रयान 3 लँडर दक्षिण ध्रूवाच्या 69.37 ते 32.35 क्षेत्रात उतरवण्यात येणार आहे.
इस्रोनं का निवडलं दक्षिण ध्रूव ? :दक्षिण ध्रूवावर जलाशयाचा गोठलेले खूप साठा असल्याचा अंदाज इस्रोला आहे. त्यामुळेच इस्रोनं चंद्रयान 1 च्या माध्यमातून चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध जगापुढं ठेवला. दक्षिण ध्रूवाच्या प्रयोगाद्वारे आपली क्षमता वापरुन नवीन शोध लावण्याचं इस्रोचं उद्धिष्टं आहे. दक्षिण ध्रूवावर पाण्याचा साठा असल्याचं स्पष्ट झाल्यास इस्रोच्या शास्त्रज्ञांना भविष्यातील मोहिमांसाठी पाण्याचं इंधन म्हणून वापर करता येणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रूवावर खूप मोठे विवर आहेत. हे विवर खूप खोल असल्यानं त्यात सूर्यप्रकाश पोहोचणं खूप कठीण आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरच एटकीन बासील एप्सिलॉन हे शिखर आहे. त्यामुळे दक्षिण ध्रूवावरील मोहीम खूप आव्हानात्मक आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन इस्रोनं दक्षिण ध्रूवावर चंद्रयान 3 उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.