महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chandrababu Naidu Arrested : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक

Chandrababu Naidu Arrested : आंध्र प्रदेश सीयआयडीनं माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे अटक केली. ३५० कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

Chandrababu Naidu
चंद्रबाबू नायडू

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 7:12 AM IST

Updated : Sep 9, 2023, 7:36 AM IST

अमरावती (आंध्र प्रदेश) Chandrababu Naidu Arrested : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. आंध्र प्रदेश सीयआयडीनं त्यांना ३५० कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात अटक केली आहे.

शनिवारी पहाटे केलीअटक:या आधी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) नं चंद्रबाबू नायडू यांना अटक वॉरंट बजावलं होतं. हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचं सांगत चंद्रबाबू नायडू यांना जामिनावर सोडता येणार नाही, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. नंद्याल पोलिसांनी चंद्रबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे अटक केली. पक्षाच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली. पोलिसांनी नायडू यांना कलम १२० (८), १६६, १६७, ४१८, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०९, २०१, १०९ rw ३४ आणि ३७ आयपीसी अंतर्गत अटक केली.

कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला : नंद्याल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचा मोठा ताफा पहाटे ३ च्या सुमारास शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये पोहचला. मात्र, त्याठिकाणी टीडीपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना तीव्र प्रतिकार केला. त्यांनी पहाटे ५.३० वाजेपर्यंत कोणालाही नायडूंपर्यंत पोहोचू दिलं नाही. शेवटी, सकाळी ६ च्या सुमारास, पोलिसांनी नायडू यांच्या वाहनाचे दरवाजे ठोठावले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अजामीनपात्र गुन्हा : चंद्रबाबू नायडू यांना आंध्र प्रदेश कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्याची माहिती डीआयजीनं दिली. या प्रकरणात ते आरोपी क्रमांक १ असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या दृष्टीनं त्यांना नोटीस देण्यात आली होती. हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचं सांगून, त्यांना जामिनावर सोडता येणार नाही, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आता चंद्रबाबू नायडू केवळ कोर्टामार्फत जामीन मागू शकतात.

हेही वाचा :

  1. 'तेलुगु जनता रामोजी रावांसोबत'; चंद्राबाबू नायडूंचा जगनमोहन रेड्डींवर गंभीर आरोप
  2. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून 'मार्गदर्शी'ला मोठा दिलासा, कार्यालयांमध्ये कामकाज सुरू राहणार
  3. Margadarsi Chit Fund : 'सीआयडी जाणीवपूर्वक आमच्या ग्राहकांना त्रास देत आहे', मार्गदर्शी चिट फंडचा आरोप
Last Updated : Sep 9, 2023, 7:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details