मुंबई : जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 7.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात, विशेषत: कृषी क्षेत्रातील १.३ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली ( Unemployment rate rises in June ) आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ( Centre for Monitoring Indian Economy ) या आर्थिक संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर जूनमध्ये 8.03 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो मेमध्ये 7.30 टक्क्यांवर होता. शहरी भागात, परिस्थिती थोडी बरी होती आणि बेरोजगारीचा दर 7.3 टक्के नोंदवला गेला, जो मे मध्ये 7.12 टक्के होता.
खेड्यांमधील कामे मंदावली :सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास म्हणाले, “लॉकडाऊनशिवाय या महिन्यातील रोजगारातील एवढी मोठी घट आहे. हे प्रामुख्याने खेड्यांमध्ये असते आणि हंगामी असते. खेड्यापाड्यातील कृषी क्षेत्रातील कामे मंदावलेली आहेत आणि जुलैमध्ये पेरणी सुरू झाल्याने परिस्थिती बदलण्याची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, जून महिन्यात 1.3 कोटी नोकऱ्या कमी झाल्या, पण बेरोजगारी केवळ 30 लाखांनी वाढली. व्यास म्हणाले की, इतर कामगार लेबर मार्केटमधून बाहेर पडले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये एक कोटींची कपात झाली.