नवी दिल्ली- पुराचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला पूराच्या संकटात 701 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटकलाहा पुराचा फटका बसला आहे. केंद्र सरकारने कर्नाटकला 629.03 कोटी मंजूर केले आहेत. हा निधी राष्ट्रीय आपत्कालीन मदत निधीमधून मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरीसह विविध जिल्ह्यांना तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर केली. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.