चेन्नई ( तामिळनाडू ) : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या घरी तसेच कार्यालयात छापे टाकले आहेत. एका चालू प्रकरणाच्या संदर्भात हे छापे टाकण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना ( CBI Raided Karti Chidambaram House Office ) सांगितले. या प्रकरणी आता एस भास्कर रामण यांना अटक करण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांचे ते जवळचे सहकारी आहेत.
Karti Chidambaram : काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांच्या घरी, कार्यालयावर सीबीआयचे छापे, जवळच्या एकाला केली अटक - कार्ती चिदंबरम ट्विट
काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांच्या घरी तसेच कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण ब्युरोने ( सीबीआय ) छापे टाकले ( CBI Raided Karti Chidambaram House Office ) आहेत. या छाप्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची सीबीआयने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. या प्रकरणी कार्ती यांच्या एका जवळच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
कार्ती चिदंबरम यांच्या घरी, कार्यालयावर सीबीआयचे छापे
कार्ती चिदंबरम यांचे ट्विट ( Karti CHidambaram Tweet ) : दरम्यान, सीबीआयने छापा टाकल्यानंतर काँग्रेसचे नेते खासदार कार्ती चिदंबरम यांनी ट्विट करून सीबीआयवर निशाणा साधला आहे. मी आता मोजायला विसरलो आहे. हे असे अजून किती वेळेस घडणार? याचेही आता रेकॉर्ड होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : आयएनएक्स मीडिया प्रकरण : दिल्ली न्यायालयाने चिदंबरम यांना बजावले समन्स
Last Updated : May 18, 2022, 9:27 AM IST