महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

New Social Media Guidlines: सोशल मीडियावर प्रचार-प्रसार करताय? सावधान! केंद्र सरकारने आणले नवीन नियम - Endorsement Know How

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सोशल मीडियावर प्रभाव सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्याला 'एन्डोर्समेंट नो-हाऊ' म्हटले जात आहे. सोशल मीडियावर प्रचार-प्रसार करणाऱ्यांना आता दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करण्यापासून मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स आणि सोशल मीडियावरील सेलिब्रिटींसाठी हे नवे नियम लागू असणार आहेत.

Center issues advertising guidelines for celebrities and social media influencers
सोशल मीडियावर प्रचार-प्रसार करताय? सावधान! केंद्र सरकारने आणले नवीन नियम

By

Published : Jan 21, 2023, 1:50 PM IST

नवी दिल्ली:ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्स आणि सेलिब्रिटींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यानुसार त्यांना त्यांच्या कन्टेन्टमध्ये डिस्क्लेमर द्यावा लागणार आहे. मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया प्रभावकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. कारण आज जाहिरात केवळ प्रिंट, टेलिव्हिजन किंवा रेडिओपुरती मर्यादित नाही. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियापर्यंत जाहिरात पोहोचली आहे. यासोबतच सोशल मीडियावर प्रभावशाली व्यक्ती आणि प्रसिद्ध व्यक्तींचा प्रभावही वाढला आहे. इन्फ्लुएंसरने केलेल्या जाहिरातीचा सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांवर परिणाम होत आहे.

जाहिरात करत असलेली माहिती कशी आहे? ही जाहिरात मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आहे की नाही? याची काळजी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्सना घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ दिशाभूल करणारी जाहिरात करता येणार नाही. कोणतीही प्रसिद्ध सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि सोशल मीडिया प्रभावक ज्यांच्याकडे वापरकर्त्यांची जास्त पोहोच आहे. जे उत्पादन, सेवा, ब्रँड किंवा अनुभवाबद्दल सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या निर्णयांवर किंवा मतांवर प्रभाव टाकू शकतात, त्यांनी जाहिरातदाराशी असलेले कोणतेही त्यांचे हितसंबंध संबंध उघड करणे आवश्यक आहे.

जाहीर कराव्या लागणाऱ्या माहितीत सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्सना मिळणारे फायदे आणि प्रोत्साहनच नाही तर आर्थिक किंवा इतर फायदे, प्रवास किंवा हॉटेलमध्ये राहण्याची सोय, मीडिया बाइट्स, कव्हरेज आणि पुरस्कार आणि रोजगार संबंध यांचाही समावेश आहे. 2019 च्या ग्राहक संरक्षण कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जाहिरात एजन्सींच्या जबाबदाऱ्या जारी केल्या गेल्या आहेत. हा कायदा सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना अनुचित व्यापार पद्धती आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून वाचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 9 जून 2022 रोजी दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींसाठी प्रसिद्धी - 2022 प्रतिबंधासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे योग्य जाहिरात आणि जाहिरात एजन्सींच्या जबाबदाऱ्या दाखवून देत आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सेलिब्रिटी आणि एंडोर्समेंट मेकर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. त्यात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात कायद्याने प्रतिबंधित करण्यात येत आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर कोण आहे:सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याचे सोशल मीडिया हँडल किंवा अकाउंटशी बरेच फॉलोअर्स संलग्न आहेत. ते त्यांच्या विशिष्ट क्षेत्रात किंवा उद्योगात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची मते तयार करतात. लोकांना त्यांच्याद्वारे शेअर केलेल्या पोस्ट आणि सामग्री खूप आवडते. अधिकाधिक लोकांना त्यांची सामग्री आवडते आणि बरेच लोक ते सामायिक म्हणजेच शेअर देखील करतात. याचा अर्थ ते सोशल मीडियावरील त्यांच्या सामग्रीद्वारे विचारांवर आणि उत्पादनांच्या खरेदीवर प्रभाव टाकू शकतात.

हेही वाचा: Chat GPT भविष्यात गुगलला टक्कर देणारे चॅट जीपीटी नेमके आहे तरी काय कसा करावा उपयोग जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details