हैदराबाद- सीडीएस बिपिन रावत यांनी अफगाणिस्तानमधील स्थितीवर भारत-अमेरिका भागीदारी 21 व्या शतकातील सुरक्षा कार्यक्रमात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की अफगाणिस्तानमध्ये जे काही घडले आहे, त्याचा अंदाज केला होता. मात्र, ते अचानक घडले आहे.
सीडीएस बिपिन रावत म्हणाले, की तालिबानची सत्ता येणार असल्याचा आम्ही अंदाज केला होता. त्यासाठी आम्ही योजनाही तयार केली होती. हे पूर्वीेचेच तालिबान आहे, केवळ त्यांचे सहकारी बदलले आहेत. तालिबानमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दहशतवादाच्या प्रश्नाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. माध्यमातील वृत्त आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या प्रवाशांमुळे तालिबानी कशा प्रकारे हालचाली करत आहेत, हे समजत आहेत.
हेही वाचा-दिल्ली दंगल: अनुराग ठाकूर यांच्यासह कपील मिश्रावर आरोपपत्र दाखल करण्याची आरोपीची मागणी
तालिबानींच्या टाईमलाईनने केले चकित
अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यानंतर तालिबान सत्तेत येण्याचा अंदाज होता. मात्र, बदललेल्या टाईमलाईनने आश्चर्यचकित केले आहे. मात्र, 20 वर्षापूर्वी असलेलाच हा तालिबान आहे. अफगाणिस्तानमधील दहशतावी कारवाया भारतामध्ये कशा पद्धतीने पसरविल्या जातील, याची आम्हाला चिंता होता. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे.
भारत-अमेरिका भागीदारावरील चर्चेत बिपिन रावत म्हणाले, की हिंद-प्रशांत आणि अफगाणिस्तानमधील स्थितीकडे एका दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. हे दोन्ही वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही क्षेत्रांमध्ये वेगवेगळी आव्हाने आहेत. तसेच दोन्ही क्षेत्रात परिस्थिती भिन्न आहे. जसे दोन समांतर रेषा एकत्रित येणे शक्य नाही. तसेच अफगाणिस्तान आणि हिंद-प्रशांतचे दोन्ही मुद्दे एकत्रित केले जाऊ शकत नाहीत.