नवी दिल्ली - राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी संबोधित केले. देशाच्या संरक्षण उद्योगामध्ये वेगाने वाढ होत आहे. सरंक्षण उद्योगामध्ये भारत आत्मनिर्भर होत असून येत्या काळात सर्व उपकरणे भारतातच तयार होतील, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारत-चीन संबंधांवरही भाष्य केले.
भारत-चीन सीमेवर तणाव आहे. तर सध्या पाकिस्तान आर्थिक संकटात असून एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर पडण्यास असमर्थ आहे. कट्टरवाद आणि अंतर्गत संघर्ष पाकिस्तानला अस्थिरतेकडे ढकलत आहे, असे ते म्हणाले. तसेच सीमेवर निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य सज्ज आहे, असेही ते म्हणाले.