महाराष्ट्र

maharashtra

Sonali Phogat murder case: सोनाली फोगट हत्याकांड.. पीए सुधीरसह सुखविंदरच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल, जबरदस्तीनं दिलं ड्रग्ज

By

Published : Nov 22, 2022, 4:56 PM IST

Updated : Nov 22, 2022, 5:40 PM IST

Sonali Phogat murder case: सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने सोनाली फोगट खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले CBI files chargesheet in Sonali Phogat murder case आहे. गोव्यातील कर्लीज बारमध्ये सोनालीचा संशयास्पद मृत्यू झाला. सोनालीचा पीए सुधीर सांगवान PA Sudhir Sangwan आणि सुखविंदर यांनी तिला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनालीच्या हत्येप्रकरणी दोघांनाही एकाचवेळी अटक करण्यात आली होती. accused of drugging her to death

सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

पणजी (गोवा) -Sonali Phogat murder case: सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने सोनाली फोगट खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले CBI files chargesheet in Sonali Phogat murder case आहे. गोव्यातील कर्लीज बारमध्ये सोनालीचा संशयास्पद मृत्यू झाला. सोनालीचा पीए सुधीर सांगवान PA Sudhir Sangwanआणि सुखविंदर यांनी तिला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनालीच्या हत्येप्रकरणी दोघांनाही एकाचवेळी अटक करण्यात आली होती. आता सीबीआयने दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. म्हापसा येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. accused of drugging her to death

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संगवान आणि सुखविंदर सिंग यांची कारागृहात चौकशी केली. सीबीआयने गोवा पोलिसांच्या 500 हून अधिक पानांच्या कागदपत्रांचीही तपासणी केली आहे. यामध्ये साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. सीबीआयने कर्लीच्या गुन्ह्याचा सीनही तयार केला होता, जिथे फोगटला ड्रग्स दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

कोण आहेत सुधीर सांगवान?सुधीर सांगवान हा सोनाली फोगट यांचा स्वीय सहाय्यक होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आदमपूरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान सोनाली यांनी सुधीर यांची भेट घेतली होती. सोनाली यांना दीर्घकाळ राजकारणात काम करायचे होते, त्यामुळे त्यांनी सुधीर सांगवान यांना पीए म्हणून ठेवले होते. सुधीर सांगवान मूळचा हरियाणातील गोहाना येथील खेडा गावचा आहे. त्यांची पत्नी सरकारी शिक्षिका आहे. मात्र, कुटुंबीयांनी सुधीरशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे सुधीर सांगवान हे रोहतकमध्ये भाड्याचे घर घेऊन राहत होते.

कोण आहेत सोनाली फोगट : सोनाली फोगाट यांचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद इथे झाला. त्यांनी 2006 मध्ये हिस्सार दूरदर्शनमध्ये अँकरिंग करून करिअरची सुरुवात केली होती. दोन वर्षांनंतर 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या पक्षाच्या सक्रिय सदस्य होत्या. सोनाली यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. सोनाली यांचं लग्न बहिणीच्या दिराशी झाले होते. त्यांना यशोदारा फोगाट ही मुलगी आहे. 2016 मध्ये सोनाली यांचा पती संजय यांचा फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी सोनाली मुंबईत होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी वसतिगृहात राहते. सोनाली गेली दहा वर्षा पासून कलेच्या क्षेत्रात काम करत होती, दूरदर्शनमध्ये ही ती कार्यरत होती. याशिवाय मॉडेलिंग तसेच अनेक मालिकांमध्येही तीने काम केलेले आहे. ऑक्टोबरमध्ये तिचा नवीन चित्रपट येत आहे. सोनाली यांनी ‘अम्मा’ या टीव्ही मालिकेत नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय त्या बंदुक आली जाटणी या हरियाणवी गाण्यातही दिसली. त्यांनी द स्टोरी ऑफ बदमाजगढ या वेब सीरिजमध्येही काम केले होते. सोनाली या सोशल मीडियावर, विशेषतः टिकटॉकवर खूप सक्रिय होत्या. टिकटॉकवर त्यांना 1 लाख 32 हजार युजर्स फॉलो करत होते. दररोज त्या टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. त्यांना टिक टॉक स्टार म्हणूनही ओळखले जायचे. बिग बॉसच्या 14 व्या पर्वातही त्यांनी हजेरी लावली होती. सोनाली फोगटचे पती संजय फोगट हे भाजपचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर भाजपने सोनाली फोगट यांची पक्षाच्या राज्य महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

Last Updated : Nov 22, 2022, 5:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details