वडोदरा ( गुजरात ):Vande Bharat Train: वडोदरा विभागातील आणंदजवळ Anand in Vadodara division वंदे भारत ट्रेन जात असताना रेल्वे रुळावर गुरे आल्याने एका गायीला धडक cattle run over incident बसली. गाडी आज गांधीनगर ते मुंबईच्या प्रवासाला निघाली होती. घटना दुपारी 3.44 वाजता घडली आणि ट्रेन सुमारे 10 मिनिटे थांबली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी दिली. one cow was hit by train
Vande Bharat Train: वंदे भारत रेल्वेला पुन्हा एकदा अपघात.. रुळावर आलेल्या गायीला जोराची धडक
Vande Bharat Train: वंदे भारत रेल्वेच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्यास तयार नाही. चोवीस तासांच्या आत आज पुन्हा गुरांचा कळप वंदे भारत रेल्वेच्या रस्त्यात cattle run over incident आला. यावेळी एका गायीला रेल्वेची धडक one cow was hit by train बसली. २४ तासात ही दुसरी घटना आहे. Anand in Vadodara division
समोरच्या कोचच्या म्हणजेच ड्रायव्हरच्या डब्याच्या नाकाच्या शंकूच्या कव्हरवर किरकोळ डाग वगळता ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नाही. ट्रेन सुरळीत चालू आहे. याची लवकरात लवकर दखल घेतली जाईल, असेही ठाकूर म्हणाले.
दरम्यान, नुकतीच सुरू झालेली मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे गुजरातमध्ये म्हशींच्या कळपावर आदळल्याने ट्रेनचे किरकोळ नुकसान झाले होते. (Vande Bharat train damaged after colliding) हा अपघात गैरतपूर ते वाटवा स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी 11.15 च्या सुमारास झाला. त्यानंतर २४ तासांच्या आतच हा दुसरा अपघात आहे.