उत्तरकाशी (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये नाताळच्या दिवशी सामूहिक धर्मांतरावरून गदारोळ झाला आहे. (mass conversion on christmas in uttarkashi). याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018 अंतर्गत काही ख्रिश्चन मिशनर्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (case against christian missionaries in uttarkashi). यात अनेक नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. शनिवारी रात्री उशिरा भाजपसह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी मिरवणूक काढून धर्मांतराचा निषेध केला. त्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे. (Mass Conversion In Uttarkashi).
चक्का जाम करत कारवाईची मागणी : मिळालेल्या माहितीनुसार, पुरोळ्याला लागून असलेल्या देवधुंग परिसरात शुक्रवारी एनजीओच्या नव्याने बांधलेल्या इमारतीबाहेर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन मिशनरीशी संबंधित काही लोकांसह नेपाळी वंशाचे आणि स्थानिक लोकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. असा प्रकार घडल्याची कुजबुज होताच ग्रामस्थ आणि हिंदू संघटनांचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी धर्मांतराचा आरोप करत गोंधळ घातला. हिंदू संघटनांनी सामूहिक धर्मांतराचा आरोप करत पोलिस आणि प्रशासनाकडे या प्रकरणाची तक्रार केली. हा गोंधळ इतका वाढला की, लोकांनी शहरात मिरवणूक काढून कुमोला तिराहे येथे चक्का जाम करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सिंह रावत यांच्या तहरीरवर नेपाळी वंशाच्या जगदीशसह काही ख्रिश्चन मिशनऱ्यांविरुद्ध उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.