महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Buffalo Died : घरावरून हेलिकॉप्टर गेले; आवाजामुळे म्हशीचा झाला मृत्यू, वाचा काय आहे प्रकरण... - हेलिकॉप्टर गेल्याने आवाजामुळे म्हशीचा मृत्यू

राजस्थानातील बेहरोरच्या कोहराना गावात रविवारी एका घरावरून हेलिकॉप्टर गेल्यामुळे मोठा आवाज आल्याने घराजवळ बांधलेल्या म्हशीचा मृत्यू झाल्याचा ( Buffalo Died due to Loud Sound ) दावा त्या व्यक्तीने केला आहे. वैमानिकावर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 13, 2022, 10:53 PM IST

बेहरोर(अलवर) : या भागातील कोहराना गावात रविवारी एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका गावकऱ्याने दावा केला आहे की, हेलिकॉप्टर घरावरून गेल्याने मोठा आवाज झाल्याने घरात बांधलेल्या म्हशीचा मृत्यू झाल्याचा ( Buffalo Died due to Loud Sound ) दावा तेथील गावकऱ्याने केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. यासोबतच म्हशीच्या मालकाने हेलिकॉप्टरच्या पायलटच्या निष्काळजीपणाबद्दल बेहरोर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी अर्ज दिला आहे.

घरावरून हेलिकॉप्टर गेल्याने आवाजामुळे म्हशीचा मृत्यू

घराच्या छतावरून हेलिकॉप्टर गेल्याने म्हशीचा मृत्यू - रविवारी परिसरात आमदार बलजीत यादव यांच्या समर्थकांनी आभार प्रदर्शन यात्रेत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून आमदार बलजीत यादव राजकीय शक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बलवीरने यांनी सांगितले की, रविवारी बेहरोर परिसरात पुष्पवृष्टी करताना हेलिकॉप्टर वारंवार फिरत होते. हेलिकॉप्टर बेहरोरच्या कोहराना गावातून जात असताना घरात बांधलेली म्हैस घाबरली आणि तिचा त्या दरम्यान मृत्यू झाला. हेलिकॉप्टर गावापासून सुमारे 10 फूट उंचीवरून फुलांचा वर्षाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पायलटच्या निष्काळजीपणामुळे म्हशीचा मृत्यू - पीडित बलवीरने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार पत्रात (हेलिकॉप्टर पायलट विरुद्ध अर्ज) म्हटले आहे की, आमदार बलजीत यादव यांच्या समर्थकांकडून परिसरात हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. यादरम्यान हेलिकॉप्टर पायलटच्या निष्काळजीपणामुळे हेलिकॉप्टर गावातील घरांच्या माथ्यावरून कमी उंचीवरून हेलिकॉप्टर गेले. त्यामुळे माझी दीड लाख रुपये किमतीची म्हैस मेली.

भरपाईची मागणी - वैमानिकावर निष्काळजीपणासाठी एफआयआर नोंदवावा, अशी मागणी पीडितेने केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. एकतर प्रशासनाने आमची म्हैस परत द्यावी किंवा म्हशीच्या किंमती इतके पैसे द्यावे असे ते म्हणाले. याप्रकरणी पीडित बलवीरने बेहरोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल केला जाणार - बेहरोरचे आमदार बलजीत यादव यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांनंतर कार्यकर्त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावातून पुष्पवृष्टी करण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. रविवारी संपूर्ण परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचवेळी प्रशासनाने म्हशीचे वैद्यकीय चाचणी केली आहे. तपास अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येईल. दुसरीकडे, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे स्टेशन प्रभारी वीरेंद्रपाल विश्नोई यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details