जैसलमेर - राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये नियमित सरावादरम्यान तोफेच्या गोळ्याचा स्फोट होऊन एक 32 वर्षीय बीएसएफ जवान हुतात्मा झाला. तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत. हुतात्मा जवान, सतीश कुमार हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी होता.
पोखरणमध्ये स्फोट, एक बीएसएफ जवान हुतात्मा; दोघे जखमी - जैसलमेर न्यूज
गुजरातच्या भुजमधील बीएसएफची 1077 वी बटालियन पोखरन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सराव करण्यासाठी आली आहे. सरावादरम्यान लक्ष्य गाठण्यापूर्वीच 105 मिमीच्या तोफ गोळ्याचा स्फोट झाला. यात 32 वर्षीय बीएसएफ जवान हुतात्मा झाला. तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत.
गुजरातच्या भुजमधील बीएसएफची 1077 वी बटालियन पोखरन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सराव करण्यासाठी आली आहे. सरावादरम्यान लक्ष्य गाठण्यापूर्वीच 105 मिमीच्या तोफ गोळ्याचा स्फोट झाला. त्यात बीएसएफ जवान शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. जखमी जवानांना जोधपूर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
हुतात्मा जवानाचा मृतदेह पोखरण येथील राजकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून पोस्टमार्टमनंतर बीएसएफ अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले जाईल. या आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सराव सत्रात आणखी एका जवानाला आपला जीव गमवावा लागला होता.