श्रीनगर -भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमा भागात होणारी एखादी चकमक ही काही नवी बाब नाही. पण, सध्या भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत- पाक सीमेवरून दोन पाकिस्तानी तरुणांना अटक केली होती. अटक केलेल्या दोघांना भारतीय लष्काराने पाकिस्तानी प्रशासनाच्या हवाली केले. दोघेही चुकून राष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आले होते.
भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून त्यांना बीएसएफने ताब्यात घेतले. सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभागाकडून त्यांची चौकशी झाली. चुकून सीमा ओलांडली की यामागे काही दुसरा हेतू होता, याचा तपास पथकाकडून घेण्यता आला. मात्र, चुकून सीमा ओलांडून आले होते, असे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चुकून राष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आलेल्या सहा जणांना यावर्षात भारताने पाकिस्तानी प्रशासनाला सोपवले आहे.
अनेकांनी अनावधानानं सीमा ओलांडल्या -
जम्मू काश्मीरमधील एक 36 वर्षीय महिलेने चुकून पुंछ येथील सीमा ओलांडून पाकच्या काश्मीरमध्ये पोहचली होती. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेला सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले होते. तर पाकच्या दोन मुलींनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश केला होता. दोघीही चुकून भारतीय सीमेत आल्या होत्या. भारतीय सैन्याने त्यांची चौकशी केली आणि त्यांना परत आपल्या घरी पोहचतं केलं. तसेच एका 8 वर्षीय पाकिस्तानी मुलाने राजस्थान येथील बारमेर सीमा ओलांडली होती. यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवानांनी या मुलाला सुखरुप पाकिस्तानच्या जवानांच्या ताब्यात दिलं होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी जवानांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याला खाऊपिऊ घालून त्याची योग्य ती काळजीही घेतली होती.
हेही वाचा -ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही फंगसची एकाच वेळी लागण; मध्य प्रदेशात आढळले दोन रुग्ण