पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. -राहुल बजाज यांचं पार्थिव त्याच्या आकुर्डी येथील बजाज कंपनी आवारातील घरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 11:30 वाजता त्याचे पार्थिव बजाज कंपनी मधील कल्चर सेंटर मधील मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
उद्योजक राहुल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील निवासस्थानी आणले - उद्योजक राहुल बजाज
11:11 February 13
आदित्य ठाकरेंनी घेतले राहुल बजाज यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन
11:10 February 13
शरद पवार बजाज यांच्या निवासस्थानी पोहचले
प्रसिद्ध उद्योजक आणि पदमभूषण राहुल बजाज यांचं काल शनिवारी पुण्यात निधन झालं. ते 83 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने उद्योग नगरी पिंपरी-चिंचवडवर शोककळा पसरली आहे. राहुल बजाज यांचं पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आल असून राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे बजाज यांचं अंत्यदर्शनासाठी घेण्यासाठी पोहचले आहे.
10:26 February 13
उद्योजक राहुल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील निवासस्थानी आणले
उद्योजक राहुल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील निवासस्थानी आणले; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लवकरच दाखल होणार