नवी दिल्ली - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज (21 एप्रिल)पासून भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी चर्चा, भेटी, काही नवे करार असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. जॉन्सन आज गुजरातमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. ते अहमदाबादमध्ये उद्योजकांसोबत चर्चा करतील. ( British Prime Minister Boris Johnson ) उद्या (22 एप्रिल)रोजी ते पंतप्रधान मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही -गेल्या वर्षी पंतप्रधान जॉन्सन यांचा भारत दौरा दोनदा रद्द करण्यात आला होता. जानेवारीत ते पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र त्यावेळी देशातील कोरोना संकटामुळे हा दौरा शक्य झाला नाही. ( British PM and PM Modi meet tomorrow ) यानंतर एप्रिलमध्येही कोरोना संकटामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. G-7 चे अध्यक्ष या नात्याने ब्रिटनने पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले होते, पण कोरोना संकटामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा होऊ शकला नाही.
उच्चस्तरीय कार्यक्रम होणार आहेत - मे 2021 मध्ये दोन्ही व्हर्चुअल बैठक झाली होती. ज्यात 2030 च्या रोडमॅपवर चर्चा झाली. यामध्ये आरोग्य, हवामान, व्यापार, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील ब्रिटन-भारत संबंधनावर (India- UK relations) चर्चा झाली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्यावर सहमती दर्शवली आहे. दरम्यान, पुढील 15 दिवसांत भारत आणि ब्रिटनमध्ये अनेक उच्चस्तरीय कार्यक्रम होणार आहेत.