नवी दिल्ली - एकाच झाडाला टोमॅटो आणि वांगी आलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र, वाराणसीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी अशी रोपं तयार केली आहेत. जी पाहून तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल. या रोपाला त्यांनी 'ब्रिमॅटो' (Brimato) असे नाव दिलं आहे.
वांगं आणि टोमॅटोचं कलम करून ब्रिमॅटो ही नवीन जात विकसित केली गेली. 25 ते 30 दिवसांची वांग्याची रोपं आणि 22 ते 25 दिवसांची टोमॅटोची रोपं यांचं ग्राफ्टिंग करण्यात आलं. कलम केलेल्या वनस्पतींचं ग्राफ्टिंग 15 ते 18 दिवसांनी शेतात लावण्यात आलं. यानंतर त्याला खत घालण्यात आले आणि त्याची काळजी घेण्यात आली. 60 ते 70 दिवसांनी एकाचं झाडाला टोमॅटो आणि वांगी लागली.