महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Women Died Accident UP : यूपीत मोठी दुर्घटना; हळदीच्या कार्यक्रमात विहिरीत पडून 13 महिलांचा मृत्यू, अनेक गंभीर - यूपीत अनेकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना ( Big Incident in UP) घडली आहे. माहितीनुसार लग्नसमारंभातील हळदी समारंभात अनेक मुली आणि महिला विहिरीत पडल्याचे सांगण्यात ( uttar pradesh several people fell in well ) येत आहे. यामध्ये काही मुलींसह 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.

Big Incident in UP
यूपीत मोठी दुर्घटना

By

Published : Feb 17, 2022, 1:36 AM IST

Updated : Feb 17, 2022, 1:18 PM IST

लखनऊ ( उत्तरप्रदेश) - उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये बुधवारी संध्याकाळी उशिरा एक मोठी दुर्घटना ( Big Incident in UP) घडली आहे. माहितीनुसार लग्नसमारंभातील हळदी समारंभात अनेक मुली आणि महिला विहिरीत पडल्याचे सांगण्यात ( uttar pradesh several people fell in well ) येत आहे. यामध्ये काही मुलींसह 13 जणींचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हळदी समारंभात सर्वजण विहिरीच्या जाळीवर बसून पूजा करत होते, तेव्हा जाळी तुटल्याने सर्वजण त्यात पडले. ही घटना नेबुआ नौरंगिया पोलीस ठाणे परिसरात घडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले. मोदींनी मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला. स्थानिक प्रशासनाकडून संभाव्य मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

चिमुकल्यांसह13 महिलांचा मृत्यू -

अपघातानंतर लोकांनी सर्वांना विहिरीतून बाहेर काढले आणि सर्वांना जिल्हा रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी 13 जणांना मृत घोषित केले. प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरू आहे, मात्र अंधारामुळे अडचण येत आहे. ही घटना नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

यूपी मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट

मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत-

जुन्या विहिरीवर असलेल्या जुन्या स्लॅब कोसळला आणि वरील सर्व नागरिक हे विहिरीत कोसळले या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये सर्व महिला आहेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल असे यावेळी. असे कुशीनगरचे जिल्हाधिकारी एस. राजलिंगम यांनी सांगितले.

अशी घडली घटना -

नौरंगिया स्कूल टोला येथील रहिवासी परमेश्वर कुशवाह यांच्या विवाह सोहळ्यात हळदी समारंभ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास गावाच्या मध्यभागी बांधलेल्या जुन्या विहिरीजवळ 50-60 महिला व मुली उभ्या होत्या. विहीर लोखंडी जाळीने झाकलेली होती, त्यावर बरेच लोक चढले होते. त्यानंतर विहिरीजवळ उभ्या असलेल्या अनेक महिला व मुली लोखंडी जाळी तुटल्याने विहिरीत पडल्या व पाण्यात बुडाल्या.

मुख्यमंत्र्यांचे आदेश -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत, की तत्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -Naik Family to Kirit Somaiya : 'आम्ही पण फासावर लटकावं अशी किरीट सोमैयांची इच्छा आहे का?' नाईक कुटुंबीयांचा सवाल

Last Updated : Feb 17, 2022, 1:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details