महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 29, 2023, 4:08 PM IST

Updated : Jul 29, 2023, 4:30 PM IST

ETV Bharat / bharat

Firecracker Factory Blast : तामिळनाडूमध्ये फटाका कारखान्याच्या गोदामात स्फोट; 9 ठार, अनेक जखमी

तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात शनिवारी सकाळी फटाका कारखान्याच्या गोदामात स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

Firecracker Factory Blast
फटाका कारखान्याच्या गोदामात स्फोट

कृष्णगिरी (तामिळनाडू) : तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील फटाका कारखान्याच्या गोदामात शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की, त्यामुळे आजूबाजूचा परिसरही हादरला. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळाकडे धावले. तोपर्यंत कारखान्यातून धूर निघू लागला होता. या स्फोटाने पलाईपेट्टई गावाला हादरून टाकले आहे.

स्फोटामुळे दुकाने आणि घरांचेही नुकसान : मिळालेल्या माहितीनुसार, पलाईपेट्टई येथील फटाका कारखान्याच्या गोदामात शनिवारी अचानक स्फोट झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे जवळपासची काही दुकाने आणि घरांचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे आणि जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले की, 'तामिळनाडूतील कृष्णागिरी येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. या अत्यंत कठीण काळात पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझी प्रार्थना आहे.'

गोदामाच्या मालकाचाही मृत्यू : आतापर्यंत 20 जणांना कृष्णागिरी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. ते गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत फटाक्यांच्या गोदामाचे मालक रवी (४५), त्यांची पत्नी जयश्री (४०), रितिका (१७), रितेश (१५), इब्रा (२२), सिमरन (२०), सरसू (५०) आणि राजेश्वरी (50) यांचा मृत्यू झाला आहे.

गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे अपघात झाल्याची शक्यता : कृष्णगिरीचे जिल्हाधिकारी सरयू, पोलीस अधीक्षक सरोज कुमार टागोर, कृष्णगिरी विधानसभा सदस्य अशोक कुमार आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पीडितांना मदत करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली. या हृदयद्रावक अपघातामागे गॅस सिलिंडरची गळती असण्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर आली आहे.

एकूण नऊ जणांचा मृत्यू : फटाका कारखान्याचे गोदाम 2020 पासून कार्यरत होते. त्याचे मालक दरवर्षी नियमितपणे नूतनीकरण करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्फोट इतका जोरदार होता की रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांनाही या स्फोटात जीव गमवावा लागला. या अपघातात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

  1. Muharram Accident : मोहरमच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; ताजिया विजेच्या तारात अडकल्याने 4 जणांचा मृत्यू
  2. Gas leaked : लुधियानात गॅस लिक झाल्याने गरोदर महिला बेशुद्ध, प्रशासनाने केला 'हा' दावा
Last Updated : Jul 29, 2023, 4:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details