महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Blast In Cracker Factory Una : फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; सात जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी - Cracker Factory blast news

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला ( blast in cracker factory in Una ) आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 10 ते 15 जण गंभीर असल्याची माहिती आहे. स्फोटानंतर परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

Cracker Factory blast in una news
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट

By

Published : Feb 22, 2022, 2:26 PM IST

Updated : Feb 22, 2022, 3:19 PM IST

उना : हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला ( blast in cracker factory in Una ) आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. 10 ते 15 जण गंभीर असल्याची माहिती आहे. स्फोटानंतर परिसरात मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरोली येथील ताहलीवाल येथे असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. स्फोटानंतर कारखान्याला आग लागली. आगीमुळे अनेक जण दगावले. जखमींना उना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलीसह सात जणांचा मृत्यू -

उना जिल्ह्यातील ताहलीवाल औद्योगिक वसाहतीतील बाथू येथे अवैध फटाका कारखाना सुरू होता. मंगळवारी सकाळी कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर झालेल्या भीषण जाळपोळीत ७ जण जिवंत जाळले. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे, जी घटनेच्या वेळी तिच्या आईसोबत येथे होती. पोलीस अधीक्षक अरिजित सेन ठाकूर (स्पास्ट ऑन स्फोट) यांनी 7 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 12 हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Feb 22, 2022, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details