गांधीनगर -भाजपल्या गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच गांधीनगर महानगरपालिकेत बहुमत मिळाले आहे. भाजपने 44 जागांपैकी 41 जागा जिंकल्या आहेत. तर, काँग्रेसला 2 आणि आम आदमी पक्षाला एका जागेवरच विजय मिळाला. गाधीनगरची निवडणूक ही राज्याचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांच्यासाठी परीक्षाच समजली जात होती. यात ते दोघेही पास झाले आहेत.
हेही वाचा -Petrol Diesel Price Hike : सलग पाचव्या दिवशी इंधन महागले, मुंबईत सर्वाधिक रेट
या निकालामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून आला. तर, भाजपचे राज्य मुख्यालय कमलम येथे दिवाळी सारखे वातावरण आहे. पाटील आणि पटेल यांच्या उपस्थिती निवडणूक विजय साजरा करण्यात आला.
काँग्रेसला 2 तर आप पक्षाला फक्त एकच जागा जिंकण्यात यश
राज्य निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, गांधीनगर महानगरपालिकेतील एकूण 44 जागांपैकी भाजपला 41 जागा जिंकण्यात यश आले आहे. काँग्रेसला 2 तर आप पक्षाला फक्त एकच जागा जिंकण्यात यश आले आहे.
गांधीनगर महानगरपालिकेत मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी गुजरात भाजप आणि राज्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भानवडमध्ये काँग्रेसचा विजय
गांधीनगर येथील निवडणुकीत भाजने मुसंडी मारली असली तरी, भानवडमध्ये भाजपला कमीच जागा जिंकता आल्या. येथे काँग्रेसला आघाडी मिळाली. काँग्रेसने 24 पैकी 16 जागा जिंकल्या तर, यंदा भाजपला फक्त 8 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे, भानवडमध्ये 1995 पासून भाजप सत्तेत होते.
मतमोजनीनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, थारा येथे भाजपने 24 पैसी 20 जागा जिंकल्या तर, येथे काँग्रेसला फक्त 4 जागा जिंकता आल्या. भाजपने ओखा नगरपालिकेत आपली सत्ता राखली आहे. येथे भाजपने 36 पैकी 34 जागा जिंकल्या आहेत, तर दोन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.
भाजपचा 184 जागांपैकी 136 जागांवर विजय
रविवारी गांधीनगर महानगरपालिका आणि इतर 3 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले होते, याबरोबरच इतर विविध स्थानिक संस्थांच्या 104 रिक्त जागांवर प्रतिनिधी निवडण्यासाठी पोटनिवडणूक देखील पार पडली होती. भाजपने 184 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवला आहे.
निकाल टॅली
गांधीनगर महानगरपालिका
एकूण जागा - 44
भाजप - 41
काँग्रेस 2
आप - 1
जिल्हा पंचायत
एकूण जागा - 8
भाजप - 5
काँग्रेस - 3