नवी दिल्ली:प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी मोठी कारवाई केली. भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले असून, खासदार नवीन जिंदाल यांची हकालपट्टी केली ( Nupur Sharma Naveen Jindal supended ) आहे. नवीन जिंदाल यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या टिप्पण्यांनी जातीय सलोखा बिघडवल्याचे पक्षाने म्हटले आहे.
नुपूर शर्मा यांच्यावरील कारवाईपूर्वी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे त्यात म्हटले आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची इच्छा होती. यासंदर्भातील एक ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुपूर शर्मासोबतच पक्षाने नवीन कुमार जिंदाल यांनाही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. नवीन कुमार जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत.